दाभोळ:- बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रेवली येथील चिराखाणीवर २६ एप्रिलला दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रकाश राठोड व त्यांची पत्नी काम करत होते. त्यांनी त्यांच्या ११ महिन्यांची मुलगी नेहाला बाजूला ठेवले होते. तेवढ्यात खाणीवर चिरा वाहतूक करण्यासाठी असलेला ट्रकचा (एमएच १२- एएल ९३२) चालक रमेश किसन चव्हाण याने मागे-पुढे न पाहता ट्रक सुरू केला. यावेळी ट्रक चालकाच्या बाजूला असलेल्या पुढील चाकाचा टायर जवळच असलेल्या नेहाच्या उजव्या पायाच्या मांडीवरून गेला व ती टायरखाली अडकली व गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नवी मुंबई येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा २९ एप्रिलला मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालक रमेश चव्हाण याच्याविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.