चारचाकी- कंटेनर अपघातात दोघांचा मृत्यू, लांज्यातील तिघे गंभीर जखमी

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे चारचाकी आणि कंटेनरच्या अपघातात दोघे जण ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये जखमी लांजा तालुक्यातील खानवली येथील आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून मोटार रत्नागिरी जिल्ह्यातील खानवली बनेकडे जात होती. या मार्गावर त्या वेळी मोटार भरधाव वेगात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मोटारीने कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मोटार अर्ध्यापर्यंत कंटेनरच्या खाली घुसली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिल भीमा शिंदे (वय ४०, रा. पुणे) या चालकांचा मृत्यू झाला तर सुमती यशवंत शिंदे (वय ७५) यांचाही अपघातात मृत्यू झाला. अपघातात नीलेश अनंत दळवी (रा. खानवली, लांजा), जानवी नीलेश दळवी (वय ४५), यश नीलेश दळवी (वय १८, सर्व रा. खानवली, ता. लांजा) असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या मोटारीत पाच प्रवासी प्रवास करत होते. अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास ४५ मिनिटांचा कालावधी लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक अनिल जाधव, पीएसआय मांदळे, सर्व पोलिस कर्मचारी, कशेडी महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक प्रवी घडे, पोलिस कर्मचारी यांच्यास पोलादपूर ग्रामस्थ, राजकीय, सामाजिन सर्व क्षेत्रातील नागरिकांनी घटनास्थळ धाव घेत मदतकार्य केले. नरवीर रेस्क टीम, श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांन घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले या घटनेची माहिती समजतात महाड- उपविभागीय पोलिस अधिकारी शंक काळे यांनीही घटनास्थळी धाव घेऊ माहिती घेतली.