स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार 1 मे रोजी पहाटे 3.15 वा. सुमारास शिरगाव बांधखिंड येथे घडली होती.

यश गणेश सोलकर (23,रा.कासारवेली,रत्नागिरी) अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 1 मे रोजी तो वाहन चावण्याचा कोणताही परवाना नसताना आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच -08-एझेड- 9920) घेउन भरधाव वेगाने परटवणे ते कासारवेली असा जात होता. तेव्हा बांधखिंड येथे त्याचा दुचाकीवरील ताबास सूटला आणि रस्त्याच्या बाजुला असलेल्या दगडी सिमेंट काँक्रिटच्या बांधाला धडक देत हा अपघात झाला. यात यशच्या डोक्याला, चेहर्‍याला, नाका-तोंडाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.