मिऱ्या बंदर खाडीत आढळला अनोळखी मृतदेह

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्या बंदर येथील खाडीत अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली. मृताचे वय अंदाजे ३० असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी सकाळी ८च्या सुमारास मिऱ्या बंदर येथील खाडीत पुरुषाचा मृतदेह असल्याची बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली. या घटनेची खबर रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृताची अद्याप ओळख पटली नसून कुणाला काही या मृताबद्दल माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.