जिल्ह्यातील १०० वृद्ध कलाकार मानधनाच्या प्रतिक्षेत

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक अशा १०० जणांची निवड शासकीय मानधनासाठी करण्यात आली. या १०० जणांना आता लवकरच दर महिन्याला मानधन मिळणार आहे. मात्र, त्यांना अद्याप मानधन न मिळाल्याने ते मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत.

जिल्ह्यामध्ये असणाऱ्या वृद्ध कलाकार व साहित्यिकांची मानधनासाठी निवड केली जाते. त्यांच्याकडून परिपूर्ण प्रस्ताव मागितले जातात. त्यामधील पात्र कलाकारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कलाकार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक वय असणारे रत्नागिरी तालुक्यातील कशेळी फणसवाडी येथील नमन कलाकार अनंत बाळू ताम्हणकर यांना हे मानधन सुरु होणार आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातील राजीवडा येथील शेख अहमद महंमद हुश्ये, गणेशगुळे येथील दशरथ रांगणकर, टिके येथील चंद्रकांत शिनगाणे, रत्नाकर ठीक, भालचंद्र सांडिम, प्रकाश सांडिम, मधुकर गोविळकर, अनंत सांडिम, विट्ठल सांडिम, गणपत गोविलकर, पांडुरंग शिनगारे, शंकर भातडे आणि विठ्ठल बंडबे, कृष्णा भातडे तर देवूड येथील किसन घाणेकर, उक्षी येथील श्रीपाद केळकर, रानपाट येथील अर्जुन मोरये, खेडशी येथील सुरेश येदरे यांचा समावेश आहे. तर उक्षी येथील गंगाराम बंडबे, प्रकाश सापटे, शांताराम घाणेकर, गणपत घाणेकर, पांडुरंग शिवगण, गणपत घाणेकर, गणपत दाजी घाणेकर, गंगाराम घाणेकर, चंद्रकांत कुवार, विठ्ठल बंडबे, सुरेश कळंबटे, गोविंद तारवे, केशव गोनबरे, पांडुरंग गोनबरे आणि पानवल येथील जयवंत होरंबे रत्नागिरी तालुक्यातील या वृद्ध कलाकार आणि साहित्यिकांचा या योजनेत समावेश आहे. या सर्वांना दर महिन्याला २,२५० रुपये मानधन मंजूर आहे. हे मानधन शासनाकडून त्यांच्या थेट बंक खात्यात जमा जमा करण्यात येणार आहे. मात्र, अर्ज मंजूर होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप त्यांच्या बंक खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे मानधन कधी जमा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.