आपल्या विरुद्ध तक्रार दिली म्हणून घरात घुसून महिलेला मारहाण

रत्नागिरी : महिलेने आपल्या विरुद्ध तक्रार दिली म्हणून शिवीगाळ करून प्रौढाने दांडक्याने मारहाण केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साद मुक्तार मजगावकर (३१, रा. कर्ला, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) सकाळी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबधित महिलेने संशयित साद विरुद्ध काही कारणातून सहा महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. सोमवारी सादने महिलेच्या घरात जाऊन शिवीगाळ करत दांडक्याने मारहाण केली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.