अपघाती मृत्यूस कारणीभूत प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

गुहागर:- निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघातास व मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी मोहन चव्हाण (२१, रा. शृंगारतळी विखारेची चाळ- गुहागर, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २१) रात्री आबलोली रस्त्यावर घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री तो दुचाकी घेऊन सोबत सुहेल इकबाल मुजावर (२५, रा. शृंगारतळी आझाद मोहल्ला गुहागर) याला घेऊन गुहागर ते आबलोली रस्त्याने भरधाव वेगाने जात होता. तो सुरळ फाट्याजवळ आला असता त्याचा दुचाकीवरील त्या ताबा सुटला. दुचाकी रस्ता सोडून खाली गेली या अपघातात सनी चव्हाणला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर मुजावरला किरकोळ दुखापत झाली.