फोनवर बोलता बोलता तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

रत्नागिरी:- फोनवर बोलण्याच्या नादात विहिरीत पडून उत्तरप्रदेशमधील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 18 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास जालगाव दापोली येथे घडली.

राकेश बुच्चुन भारव्दाज (38 मुळ रा.गोंडा उत्तरप्रदेश सध्या रा.जालगाव दापोली) असे विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री तो राहत असलेल्या घराबाहेर फोनवर बोलत होता. तेव्हा खबर देणाार यांनी त्याला जेवायला बोलावण्यासाठी फोन केला. राकेशचा फोन न लागल्याने खबर देणार यांनी घराबाहेरच्या आवारात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता राकेश जवळील विहिरीत पडलेला त्यांना दिसून आला. तेव्हा खबर देणार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी राकेशला विहिरीबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय दापोलि येथे दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी राकेशला तपासून मृत घोषित केले. याबाबत दापोलि पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.