प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू

रत्नागिरी:- प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे फिरण्यासाठी आलेल्या वृध्दाचा चक्कर येउन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7.14 वा. घडली. दिगंबर मुकुंद कर्लेकर (65, रा.टिळक आळी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

शुकवारी सायंकाळी ते प्रमोद महाजन क्रीडांगणात फिरण्यासाठी गेले असताना त्यांना अचानकपणे चक्कर आली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम लोटलीकर हॉस्पिटलमध्ये नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.