हे शक्ती प्रदर्शन नाही, कार्यकर्त्यांच्या भावना

रत्नागिरी:- शिवसेनेचे आजचे हे शक्ती प्रदर्शन नाही तर कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. किरण उर्फ भैय्या सामंत यांना खासदारकीची उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत आणि मी तर त्यांचा धाकटा भाऊ आहे, माझी भावना काही वेगळी नाही. त्यामुळे तेथील राजकीय वातावरणाबाबत मी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर भावना घालणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.

विरोधीपक्षाच्या एका आमदाराने आमच्यावर खालच्या पातळीवर टिका केली. घरापर्यंत पोहचू नका, तुमच्यापेक्षा वाईट मी बोलू शकतो. स्वतःच्या मतदार संघ सांभाळा तुमच्या धमक्यांना मी भिक घातल नाही. माझा संय्यम माजी मजबूरी नाही. बालीश चाळे सोडा, असा गर्भित इशाराही सामंत यांनी विरोधकांना
दिला.

हॉटेल विवेकच्या मैदाना आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चर्चेशाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीचे रुपांतर मोठ्या मेळाव्यात झाले. सामंत प्रेमी हजारोच्या संख्येने यावेळी गोळा झाले होते.

उदय सामंत म्हणाले, आम्हाला शकत्ती प्रदर्शन करायचे असते तर चंपक मैदानात केले असते. परंतु या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. राणेंची मी भेट घेतली त्याची देखील चर्चा झाली. परंतु या भेटीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे, या दृष्टीने काम करण्याचा निर्णय झाला. या सर्व घडामोडीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता भरडला जोतो. त्या भावनेतून ट्विट केले होते. परंतु त्याबाबत आम्ही लगेच खुलासा केला. दुसरे टिका करतात म्हणून आपण टिका करणे ही आपली संस्कृती नाही. कारण आपल्याला आपली ताकद माहिती आहे. आपल्याला अन्यय सहन होत नाही. २००५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना आमच्या नगरसेवकांवर अन्याय होत होता. परंतु आम्ही काय करू शकतो, हे तेव्हा दाखवून दिले. १४ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देऊन अशोक मयेकर यांना नगराध्यक्ष केले तर बशिर मुर्तुझा उपनगराध्यक्ष झाले.

भाजपने या जागेवर दावा केला, बूथ वॉरिअरची बैठक घेतली त्याबाबत आकस असण्याचे कारण नाही.
आपण पुन्हा चर्चा करून सर्व्हे घेऊन निर्णय घ्यावा, असे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सांगू. कारण एकवेळ मी लोकांच्या संपर्कात कमी पडेन, परंतु भैय्यांचा संपर्क माझ्या पेक्षा जास्त आहे. म्हणून या जागेसाठी सर्वांच्या भावना आहेत. महायुतीचा कोणताही उमेदवार असेल तर त्याला निवडून आणू. आपली भावना मांडली आहे. सेनेची ताकद दाखवली आहे. पण महायुतीच्या आदर ठेऊन काम करायचे आहे. कुठीही कटुता येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. कारण आपल्याला पाचही आमदार निवडून आणायचे आहेत. आमची ही भावनिक मागणी नाही तर प्रामाणिक मागणी आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.
गुवाहटीला जाण्याचा जो निर्णय घेतला तो रत्नागिरीच्या भल्यासाठीच घेतला. कारण एकनाथ शिंदे मुख्यंमंत्री झाले. त्यांनी आजवर जेवढा निधी मिळाल नसेल तेवढी विकास कामे दिली. त्यामुळे अशा व्यक्तीला मोठे करण्याची जबाबदारी आपली आहे, असेही सामत म्हणाले.