एमआयडीसी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- एमआयडीसी-मिरजोळे येथील सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश गणपत पावसकर (रा. साईभूमीनगर- शिरगाव, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २१) रात्री सव्वा आठच्या सुमारास एमआयडीसी मिरजोळे येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्सेटबल रोशन सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.