शासनाच्या जागा कमी दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवत  32 लाखांची फसवणूक

खेड:-शासनाच्या सर्व जागा कमी दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवत यासाठी जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नसल्याचे खोटे सांगून 32 लाख 16 हजार 100 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल अंकुश राणे (रा. आंबवली) याच्यावर गुरूवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2014 ते 2023 याकालावधीत घडल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

यातील संशयित अनिल राणे याने 2014 ते 2023 पासून म्हाळुंगे गट नं. 466, 410, आंबवली गट नं. 1752 (अ), 1752 (ब), 1752 (क), 1752 (ड), ऐनवली गट नं. 07, वरवली गट नं. 952 ही जागा विक्री करणार असल्याचे सांगितले. या जागेकरिता फिर्यादी व फिर्यादीचे पती यांनी आरटीजीएस, फोन पे एन.ई.एफ.टी., धनादेश, रोख स्वरूपात 31 लाख 84 हजार 100 रूपये संशयितास दिले.