जिल्हाभरात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला

रत्नागिरी:- कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला जिल्ह्यात भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या रुपे लावण्यात येत असून जिल्ह्यात 1399 पालख्या सजणार आहेत. तर 1315 ठिकाणी सार्वजनिक तर 2854 खाजगी होळ्या उभारण्याला पारंभ झाला आहे.

रत्नागिरी जिह्यात शिमगोत्सव जल्लोषात साजरा करण्याची फार पूर्वी ंपासूनची प्रथा आहे. फाक पंचमीला गावागावात होळया उभ्या करून शिमगोत्सवाची सुरूवात होते. आठ दिवस हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यापमाणे गुरूवार १४ मार्च फाल्गुन पंचमी (फाक पंचमी) पासून या जल्लोषी उत्सवाला खऱया अर्थाने सुरूवात झाली आहे. आठ दिवसांनी होळयांचा होम झाल्यानंतर ग्रामदेवतांच्या शिमगोत्सवाला सुरूवात होते. अनेक ठिकाणी ग्रमदेवतांच्या पालख्या शिमगोत्सवाच्या दिवशी होळया घेण्यासाठी मंदीराबाहेर पडतात. ढोल ताशांच्या गजरात आणि फाकांच्या आवाजात पालख्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येते. काही ठिकाणी तर पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगतो आणि याला हजारो भक्तगण हजेरी लावतात.

शिमगोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल झाल्याने गावाचे वातावरण पूर्णत: बदलुन जाणार आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल होणार आहेत. फाक, ढोलांच्या निनादाने कोकण दणाणुन निघते. या शिमगोत्सवाची धुम साजरी होणार आहेत.