बावनदी येथील अपघातप्रकरणी मृत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

देवरुख:- देवरुख-साखरपा मार्गावरील बावनदी येथे दुचाकी व महेंद्रा जितो गाडी यांच्यात झालेल्या अपघातप्रकरणी मृत दुचाकीस्वारावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची खबर सहाय्यक पोलीस फौजदार संजय मारळकर यांनी दिली. सिद्धेश बळीराम गावडे असे आरोपीचे नाव आहे. सिद्धेश गावडे हा दुचाकी घेऊन रविवारी रात्री १०.४५ वाजता देवरुखहून साखरप्याच्या दिशेने जात होता. तर महिंद्रा जितो गाडी साखरप्याहून देवरुखच्या दिशेने येत होती.

बावनदी पुलानजीक दुचाकीने जितो गाडीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात सिद्धेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान सिद्धेश याचा मृत्यू झाला. सिद्धेशने दुचाकी अतिवेगाने चालवत, रस्त्याची विशिष्ठ परिस्थिती लक्षात न घेता चुकीच्या बाजूला जाऊन हमींद्रा जितो गाडीला धडक दिली. दोन्ही वाहनांच्या नुकसानीस व स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सिद्धेश गावडे याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलाम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत अधिक तपास देवरुख पोलीस करीत आहेत.