काजरघाटी येथे कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

रत्नागिरी:- शहराजवळील काजरघाटी येथे कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. शहर पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास काजरघाटी येथील वळणावर घडली.

दशरथ गणपत बाणे असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. बाणे हे आपल्या ताब्यातील कार (एमएच-४६ एक्स ८३१३) घेऊन हरचेरीहून रत्नागिरीकडे येत असताना काजरघाटीतील खालच्या वळणावर वाहन निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकी (एमएच-०८ बीबी ०१३८) ला धडक दिली. या अपघातामध्ये अफसाना साहिल मुल्ला (२७) व दुचाकीच्या मागे बसलेले त्यांचे वडिल खालीद उमर होडेकर ( ५४ रा. सोमेश्वर मोहल्ला, रत्नागिरी ) यांच्या लहान मोठ्या दुखापतीस कारणीभूत झाला. तसेच अपघाताची खबर न देताच निघून गेला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश तटकरी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.