भाट्ये-खोतवाडी येथे विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई

रत्नागिरी:- शहराजवळील भाट्ये-खोतवाडी येथे विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २५० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मोहन पांचाळ (वय ३६) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ७) रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना हातभट्टी दारु विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी धाड टाकली यामध्ये २५० रुपयांची ५ लिटर दारु सापडली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.