धनादेश अनादर प्रकरणी दंडासह कैदेची शिक्षा

खेड:- येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेतून कर्ज घेतलेल्या मात्र त्याची परत फेड करण्यासाठी कर्जदारांनी दिलेला धनादेश न वठल्याने या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात खेड न्यायालयाने दोन लाख रुपये दंड व तीन महिने साध्या कैदेची शिक्षा कर्जदाराला सुनावली आहे.

खेड येथील शिवचैतन्य सहकारी पतसंस्थेतून चंद्रकांत धोंडीबा बनकर यांनी कर्ज घेतले होते. परंतु ते परतफेड करत असताना त्यांनी दिलेला धनादेश वटला नाही. परिणामी पतसंस्थेने त्यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.