नेपाळी खलाशाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- राजिवडा येथे बोटीवर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या नेपाळी खलाशी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सुरेश मोतीलाल डंगोरा (वय ३३, रा. राजिवडा जेटी मुळ: कैलाली, नेपाळ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २५) सकाळी साडेआठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डंगोरा शनिवारी (ता. २४) रात्री आठच्या सुमारास जेवण करुन अलमर्यम बोटीवर झोपला होता. रविवारी सकाळी उठला नाही म्हणून त्याच्या सोबत असलेल्या आयुष चौधरी या खलाशाने बोट मालकाला सांगितले. त्यांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डंगोरा यास तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.