अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण

मंडणगड:- तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याची तक्रारी मंडणगड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. संचधिताच्या नातेवाईकांनी मंडणगड पोलिस ठाण्यात ८ फेब्रुवारीला तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे टीव्ही बघत बसले होते. मोबाईल कोठे ठेवला आहे हे बघण्यासाठी पाहण्यासाठी गेले असताना त्यांना मुलगी घरात दिसली नाही. तिचा परिसरात शोध घेतला पण ती मिळून आली नाही. ती जाताना मोबाईल घेऊन गेली आहे. तिला मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषा अवगत असून, तिने लाल अबोली रंगाचा गाऊन परिधान केला आहे. पायात काळ्या रंगाची साधी चप्पल घातली आहे.