रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज उद्घाटन

उद्यम रजिस्ट्रेशन, आधार, पीएम विश्वकर्मा नोंदणी होणार

रत्नागिरी:- मोदी सरकारने युवकांसाठी आणलेल्या योजनांची थेट महिती देत नव उद्योजक घडवण्यासाठी आणि उद्योग करणाऱ्यांना बळ देण्यासाठी भारत सरकारचे सुक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालय थेट तुमच्या दारी आले असून रत्नागिरीत 19 व  20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘रत्नागिरी औद्योगिक महोत्सवा’चे उदघाटन केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज होणार आहे.

देशाचे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने 19 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रत्नागिरी येथे जलतरण तलाव, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे 2 दिवसीय “रत्नागिरी औद्योगिक महोत्सव” आयोजित करण्यात असून केंद्रीय मंत्री राणे साहेब यांच्या हस्ते सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या डेप्युटी डायरेक्टर जनरल अनुजा बापट, एमएसएमई नागपूरचे संचालक पी. एम. पार्लेवार, खादी ग्रामोद्योग, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, एमएसएमई नागपूरचे सहसंचालक डॉ. व्ही. आर. शिरसाट, एमएसएमई दिल्लीचे सहसंचालक अमित तमारिया, गौरव कटारिया, सहाय्यक संचालक, नागपूर व्ही व्ही खरे, राहुल मिश्रा, मनोज शर्मा, क्वाअर बोर्ड मुंबईच्या विभागीय संचालक गीता भोईर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.

या उदघाटन कार्यक्रमात नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 10 प्रातिनिधिक उद्योजकांना बँकेच्या कर्ज वाटपाचे धनादेश या कार्यक्रमात दिले जाणार आहेत. उदघाटन कार्यक्रमानंतर दुपारी आणि मंगळवारी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या ‘रत्नागिरी औद्योगिक महोत्सवा’मध्ये या प्रदर्शनात 60 वेगवेगळे स्टॉल मांडले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यमान आणि नव उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करून रत्नागिरी जिल्ह्यातील लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करण्याच्या मुख्य उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनांबद्दल तसेच त्यांना सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेची जनजागृती करून देणे आणि योजनेचा लाभ घेणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनात उद्यम रजिस्ट्रेशन नोंदणी, आधार नोंदणी, पीएम विश्वकर्मा नोंदणी केली जाणार आहे. तर प्रदर्शनामध्ये रत्नागिरीतील उद्योजक आपली उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी देखील केली जाईल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमादरम्यान स्वयंरोजगार आणि उद्योजकता या विषयावर कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. संचालक, MSME-DFO यांनी सर्व विद्यमान आणि संभाव्य उद्योजकांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

त्याचप्रमाणे, 20 फेब्रुवारी रोजी MSME द्वारे विक्रेता विकास कार्यक्रम देखील आयोजित केला जाईल ज्यामध्ये HPCL, VPCL, IOCL, कोकण रेल्वे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सहभागी होतील. तांत्रिक सत्रादरम्यान, प्रत्येक PSU मधील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संस्थेची विक्रेता नोंदणी प्रक्रिया समजावून सांगतील आणि तांत्रिक सत्रादरम्यान त्यांच्या आवश्यकता देखील स्पष्ट करतील. उदयम नोंदणी आणि शासन कार्यक्रमादरम्यान उद्योजकांची ई-मार्केट प्लेस नोंदणी देखील केली जाईल.

KVIC, NSIC, DIC आणि बँकांचे अधिकारी MSEs च्या फायद्यासाठी त्यांच्या संबंधित योजनांबद्दल सादरीकरणे देखील देतील. एमएसएमई-डीएफओचे अधिकारीही मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती देतील. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यमान आणि नवउद्योजक आणि तरुणांना निश्चितच मदत होईल, त्यामुळे या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एमएसएमई-डीएफओ, नागपूरचे संचालक पी.एम.पार्लेवार यांनी केले आहे.