कोळंबे येथे महिलेची घरात गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे येथील लक्ष्मीनगर येथे प्रौढ महिलेने राहत्या घराच्या किचनमध्ये अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.15 ते दुपारी 1 वा.कालावधीत घडली आहे.

सुयश्री सत्यवान पवार (45, रा.कोळंबे, लक्ष्मीनगर, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढेचे नाव आहे. याबाबत तिच्या नातेवाईकांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, शनिवार 17 फेब्रुवारी रोजी घरात कोणीही नसताना सुयश्री पवार यांनी राहत्या घराच्या किचनमध्ये सिलींगच्या फॅनच्या हुकला वायरने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी 1 वा.सुमारास त्यांचे नातेवाईक घरी आले असता त्यांना सुयश्री गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. नातेवाईकांनी पूर्णगड पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.