नवीन कोळकेवाडी येथे मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- चिपळूण ते धामणंद मार्गावर नवीन कोळकेवाडी येथे मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. रवींद्र अशोक भुवड (३५, रा. दळवटणे) असे मृताचे नाव आहे.

२२ जानेवारी रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास रवींद्र भुवड हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांचे नियंत्रण सुटले व ते रस्त्यावर कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता दि. ५ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांचे निधन झाले. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.