दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालका विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून गोळप मशिद ते गोळप बायपास रस्त्यावर अचानकपणे येत एका दुचाकीला धडक देत अपघात केला.याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वा. घडली.

याबाबत भानुदास प्रभाकर मेस्त्री (52,रा.गावखडी सुतारवाडी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,मंगळवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील होन्डा व्टिस्टर दुचाकी (एमएच- 08-वाय- 1630) वरुन सुर्यकांत अंकुश पांचाळ (64, रा.गावखडी, सुतारवाडी) यांना घेउन रत्नागिरी ते गावखडी जाण्यासाठी गोळप बायपास ते गोळप मशिद अशील चालवत घेउन जात होते.त्याचवेळी अज्ञात चालक आपल्या ताब्यातील (के.ए- 28-ईएफ- 4984) वरुन मौजे गोळप मशिद ते गोळप बायपास जाणार्‍या रस्त्यावर अचानक समोर येउन त्याने खबर देणार यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. अपघातप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 279,337,मोटार वाहन कायदा कलम 184,160,177,161 (3)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.