आठवडा बाजार येथे बेशुध्द अवस्थेत सापडलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील बेशुध्द अवस्थेत सापडून आलेल्या प्रौढाचा मृत्यू झाला.ही घटना मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 3.30 वा.घडली.

साहिल वहाब नेवरेकर (40,रा.कुरधुंडा,संगमेश्वर) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत त्याच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानुसार,साहिल नेवरेकर हा मंगळवारी दुपारी 2 ते 2.30 वा.सुमारास आठवडा बाजार येथे बेशुध्द अवस्थेत पडलेला मिळून आला होता.त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी साहिला तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.