चिंचखरी येथील अठरा वर्षीय युवती बेपत्ता

रत्नागिरी:- श्रेया मिलिंद भाटकर (वय वर्षे 18, राहणार चिंचखरी, पहिली वाडी, रत्नागिरी) ही दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा. चे सुमारास घरातून गोगटे कॉलेज येथे कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली होती. ती संध्याकाळ पर्यंत परत न आल्याने तिचा भाऊ अथर्व मिलिंद भाटकर (वय 21 वर्षे) याने त्याच दिवशी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अथर्व याने आपल्या नातेवाईकांकडे, श्रेया हिच्या मैत्रिणीकडे व आजूबाजूचे परिसरात तिचा शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने ग्रामीण पोलीस ठाणे येथे नापत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या बाबत पुढील तपास सपोको. एस. एम. सावंत करीत आहेत. सदर मुलगी कोणाला आढळून आल्यास किंवा काही या बाबत काही माहिती असल्यास ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.