कोचिवली एक्स्प्रेसला जादा कोच जोडणार

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या लांब पल्ल्याच्या पोरबंदर कोचुवेली एक्स्प्रेसला जादा कोच जोडण्यात येणार आहे. कोकणसह गोव्यातील पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक 1 फेब्रुवारीच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) या परतीच्या प्रवासात धावताना या एक्स्प्रेस गाडीला दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजीच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीतील एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

हंगाम देखील तीन टप्प्यांत विभागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्यातील काजू बीचा आकार कमी होण्याचा अंदाज आहे.
काजूवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे चार वर्षापूर्वी प्रतिकिलो 200 रुपये असणारा काजू बीचा दर 100 ते 80 रुपयांवर आला. त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत आले आहेत. अनेकांच्या आर्थिक समस्यांनी काजूचा उद्योग विस्कळीत झाला आहे. गतवर्षी हमी भाव देण्याची मागणी मान्य केलेल्या सरकारने अद्यापही काजूला हमी भाव दिला नसताना काजूवरील आयात शुल्कात कपात केली आहे.
याचा फटका काजू प्रक्रिया उद्योजकांसह बागायतदारांनाही बसला आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात तरी काजूला हमी भाव मिळावा, यासाठी बागायतदारांनी आंदोलनाची तयारी केली आहे. एकंदरीत काजू हंगामाबाबत यंदाही नाराजी
आहे.