जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. भास्कर जगताप यांची नियुक्ती

रत्नागिरी:- जिल्हा शल्य चिकित्सक पदावर डॉ. भास्कर जगताप यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संघमित्रा फुले गावडे यांची मनोरुग्णालय येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.

२०२० मध्ये डॉ. अशोक बोल्डे रजेवर गेल्यानंतर डॉ. फुले यांच्याकडे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक पदभार सोपवण्यात आला. काही महिन्यानंतर त्या जिल्हा शल्य चिकित्सक बनल्या. त्यांच्या काळात जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात झाले. दरम्यान कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.