कुवारबाव येथील दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी

दुकान पुर्णतः जळून खाक ; तरुणांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव बाजारपेठे येथे रस्त्याच्यालगत असलेल्या ब्युटीपार्लर व कॉस्मेटिक दुकानाला काल रात्री अचानक आग लागली. मात्र एवढी मोठी होती की पुर्ण गाळा आगीच्या भक्षस्थानी गेला. पुर्णतः दुकान जळून खाक झाले. आगीत तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र पानवल येथून रात्री येणाऱ्या तरुणांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आली व अनर्थ टळला.

कुवारबाव बाजारपेठे येथे भैय्या भोगले यांची मालकी असलेल्या गाळ्यात मंगेश कृष्णा गुरव यांचे ब्युटीपार्लर व कॉस्मेटिक दुकान होतो. शनिवारी रात्री पानवल येथून गणपती कारखान्यातून रत्नागिरी येणाऱ्या अॅड. बंटी वणजू, परिमल खेडेकर, नितीन रोडे, सुमित संसारे या तरुणांना आग धुमसत असताना दिसली. या तरुणांनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या बाजूच्या रस्त्याने जाऊन पाहिले असता गाळ्याला आग लागल्याचे निदर्शनास आली. त्यावेळी पतसंस्थेत कामाला असलेले विजय कळंबटेही तेथे धावत आले. तत्काळ अॅड. बंटी वणजू याने बिपीन बंदरकर यांना फोन करुन फायरबिग्रेड पाठवा कुवारबाव बाजापेठेत आगली लागली आहे असे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिपीन बंदरकरनी ताबडतोब एमआयडीसी आणि पालिकेला, शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. महावितरण कंपनीला कळविल्यानंतर वीज पुरवठा खंडित केला. तेवढ्यात एमआयडीसी आणि पालिकेचे पाण्याचे बंब, पोलिस हजर झाले त्यांनी ताबडतोब जीवाची परवान न करता एमआयडीसी आणि पालिकेच्या फायर फायटरनी आग विझवायला सुरवात केली. तोपर्यत भैया सामंत ही तेथे पोहोचले माजी सरपंच राजू तोडणकर, भैया भोगले, विजय खेडेकर, संतोष कदम, जितू शेट्ये, ओंकार मोरे आणि बहुसंख्या नागरिकही मदतीला धावले आणि काही क्षणात आग आटोक्यात आली. ज्या तरुणांच्या सतर्कतेमुळे ही आटोक्यात आली त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र या आगीत दुकान पुर्णतः जळून खाक झाले. टेबल, कॉस्मेटिक, लाकडी कॉऊटर भस्मसात झाले. पोलिसांनी या दुकानाचा पंचनामा केला. या दुकानचे ३ ते ४ लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.