जिल्ह्यातील साडेतीन हजार अंगणवाडी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम

रत्नागिरी:- अंगणवाडी कर्मचाऱयांऱयांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा परिणाम बालके पोषण आहारापासून वंचित राहिल्याची दखल एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागस्तरावरून घेण्यात आली. त्यानंतर अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात या बेमुदत संपात सहभागी झालेल्या 1 हजार 434 अंगणवाडी कर्मचारी अंगणवाड्यांमध्ये कार्यरत झाल्या आहेत, तर अजूनही 3 हजार 602 अंगणवाडी कर्मचारी संपात ठाम राहिल्या आहेत.

गेल्या 4 डिसेंबरपासून पुकारलेल्या बेमुदत संपाची अजूनही शासनस्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्dयात 2 हजार 969 अंगणवाड्यांना लागलेले कुलूप लागले होते. या बेमुदत संपाचा परिणाम बालके पोषण आहारापासून वंचित राहिल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्याची दखल एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या सहाय्याने अंगणवाड्यांचा पंचनामा करुन पर्यवेक्षिकांनी तत्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत.

या संपामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यातील सुमारे 30 हजाराहून अधिक बालके पोषण आहारापासून वंचित राहिली आहेत. राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱयांचा संप सुरु असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी आहार पुरवठ्याची, अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकाऱयांना यापूर्वीच दिल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतीच्या सहाय्याने अंगणवाडी सेविकांच्याकडून पंचनामा करुन अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी तत्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात. नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱयांनी स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या समक्ष पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार जिल्हास्तरावर महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद यांनी कार्यवाही सुरू केली. जिल्ह्dयात एकूण 5 हजार 69 अंगणवाडी कर्मचारी संख्या आहे. त्यापैकी पूर्व परवानगीने रजेवर असलेल्या कर्मचारी 36 जणी आहेत. सद्या सुरू असलेल्या बेमुदत संपात एकूण 3 हजार 602 कर्मचारी आजही सहभागी आहेत. तर पशासनातर्फे केलेल्या आवाहनानुसार 1 हजार 434 कर्मचारी अंगणवाड्यांवर हजर झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 868 अंगणवाड्यांचे लागलेले कुलूप उघडले आहे.