कुर्धे येथे बेकायदेशीरपणे गावठी दारू बाळगल्याप्रकरणी वृद्धाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील कुर्धे परिसरात बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची 10 लिटर दारु विक्रीसाठी जवळ बाळगणार्‍या वृध्दा विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई रविवार 21 जानेवारी रोजी रात्री 8.45 वा.करण्यात आली.

दिनकर रामचंद्र म्हादये (70,रा.मेर्वी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात पोलिस नाईक सुदेश शिंदे यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,रविवारी रात्री संशयित हा प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये 510 रुपयांची 10 लिटर गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम क 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे