चहाच्या टपरीत घुसलेल्या ‘त्या’ मोटार चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाजूला रस्त्यावर असलेल्या चहा टपरीत मोटार घुसून टपरीचे नुकसान केले. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १४) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शोभा श्रीधर साळवी (वय ८२, रा. कसोप, मराठवाडी, रत्नागिरी) यांची जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला रस्त्यावर चहाची टपरी आहे. रविवारी अज्ञात मोटार चालकाने मोटार भरधाव वेगाने चालवून चहाच्या टपरीत घुसला यामध्ये चहा टपरीचे नुकसान झाले. स्वतःच्या दुखापतीस व नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.