पुढील काही दिवस रत्नागिरीतील पारा घसरण्याची चिन्हे

रत्नागिरी:- चार दिवसांपूर्वी असेलेल ढगाळ वातावरणनिवळून आता वातावरण कोरडे झाले असले आणि पावसाने उघडीप दिली असली तरी कोकणात किमान तापमानातील वाढ कायम आहे. मात्र, संक्रमणकालावधी ओसरल्यानंतर पुढील दोन दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता असून तंडी परतेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातीव शीतलहरी सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे थंडी पुन्हा वाढणार असली तरी अरबी समुद्रात केरळच्या किनार्‍यालगत चक्राकार वार्‍याची स्थिती सक्रीय असल्याने कोकणात थंडी परतायला दोन दिवस लागतील.
सोमवारपासून निरभ्र आकाशासह किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.पावसाचे सावट दूर होताच किमान तापमानात घट होऊ लागली आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात पारा पुन्हा 19 अंशांच्या खाली घसरला आहे. तापमानात घट होत पारा 2 ते 3 अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी रत्नागिरीतील शहरी भगासहीत ग्रामीणभागात कामाल तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. गेल्या दोन दिवसात त्यामध्ये 1 ते 2 अंशाची घट झाली असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.