रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोकण प्रादेशिक पक्षाकडून शकील सावंत यांना उमेदवारी

रत्नागिरी:- कोकणाला विकासाच्यादृष्टीने नेहमीच कॉर्नर पिस (कोण्याचा तुकडा) म्हणून बगल दिली आहे. त्यामुळे हायटेक बसस्थानके असो, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गचे चौपदरीकरण,वा येथील पर्यटन, गडकिल्ले सर्वं क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाले आहे. लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती नसल्याने कोकण आज विकासापासून वंचित आहे. म्हणून कोकणाच्या विकासासाठी कोकण प्रादेशिक पक्ष आम्ही स्थापन केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदरासंघातून शकील सावंत हे आमच्या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करतो. कोकणात पक्षाचे १२ उमेदवार देणार, अशी माहिती पक्षाचे संयोजक ॲड. ओएशी पेचकर यांनी दिली.

हॉटेल सावंत पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला संयोजक ॲड. रती सहस्रबुद्धे, लोकसभेचे उमेदवार शकिल सावंत आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, सामाजिक भावनेतून मी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकराणापासून अनेक विषयात जनहित याचिका दाखल करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध विषयांवर कायदेशर भांडलो. परंतु अपेक्षित यश येत नाही. कोकणाच्या कॅलिफोर्निया व्हावा, असे अनेकवेळा बोलले जाते. मात्र कोणत्याच्या लोकप्रतिनिधीकडे ती राजकीय इच्छाशक्ती नाही. चार वर्षांमध्ये समृद्धी महामार्ग झाला. परंतु १३ वर्षे आम्ही मुंबई-गोव महामार्गासाठी झटतो. अजूनही तो पुर्ण झालेला नाही. प्रवाशांच्यादृष्टीने महत्ताचे असलेले हायटेक बसस्थानकाची काय परिस्थिती आहे, ही कामे अजून तशीच पडुन आहेत. सिंधुदुर्गमधील
पाणबुडीसारखा ८०० कोटीचा प्रकल्प गुजरातला गेला. पर्यटन विकासाच्यादृष्टीने काहीच केले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरतेचे साक्षिदार गडकिल्ल्यांची अवस्था वाईट आहे. हे सर्व पाहिल तर जोवर सत्तेत येत नाही, तोवर हे होणार नाही, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही २७ डिसेंबर २०२३ ला कोकण प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. निवडणुक आयोगाकडे हा पक्ष रजिस्टर झाल्याचा मेल देखील आम्हाला प्राप्त झाला आहे. लवकरच आमचे चिन्ह जाहिर होईल.

मेडिकल टुरिझम, गडकिल्ल्यांचा विकास, मच्छीमार, आंबा बागायतदरा या क्षेत्रांमध्ये प्राधान्याने काम करण्याचे धोरण निश्चित केले आहे. मुंबई, नवी-मुंबई, ठाणे, पालकर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे आमचे कार्यक्षेत्र आहे. कोकण पुरता मर्यादीत हा पक्ष आहे. कोकत्या पक्षाने काय केले, या खोलात न जाता आम्ही काय करणार हे जनतेला पटुवुन देऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आमचा पहिला उमेदवार शकिल सावंत असल्याचे मी जाहिर करतो. उद्योजक म्हणून त्यांचे नाव आहे. परंतु त्यांना समाज कार्याचीही आवड असल्याने त्यांची विविध विषयांवर मुलाखत घेऊन हा उमेदवार आम्ही निश्चित केला आहे. त्यांना एक व्हिजन आहे, असे ॲड. पेचकर म्हणाले.

कोकण प्रादेशिक पक्षाचे लोकसभेचे उमेदवार शकिल सावंत म्हणाले, मला कोकणासाठी बरच काही करण्याची इच्छा आहे. मी चौदा वर्षे हॉटेल व्यवसायात आहे. परंतु पर्यटन विकासाच्या दृष्टीने कोकणात मागासलेपणा जाणवतो. अपेक्षित पर्यटक येत नाहीत. चांगले बिच आहेत, गडकिल्ले आहेत, गावांमध्ये आरोग्य सुविधांची वानवा आहे. त्यासाठी सत्तेत असणे महत्ताचे आहे. म्हणून जनतेच्या सेवेसाठी मी लोकसभा निवडणुक रिंगणात उतरलो आहे. मी आगामा काळात प्रत्येक घरा-घरात मला जायचे आहे. सभा, मेळाव्यांपेक्षा मतदारांपर्यत पोहचने हा माझा मुख्य उद्देश आहे. तरुण सुशिक्षित आहे, परंतु त्याला रोजगार नाही. म्हणून रोजगार, उद्योग निर्माण करायचे आहेत.