गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- बेकायदेशीर गुरांची वाहतुक करणाऱ्या वाहनाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या कार्यकर्त्यांनी पकडली. शहर पोलिस ठाण्यात वाहन चालक व मालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मिरजोळे जांभुळ फाटा येथे निदर्शनास आली. मिरजोळे-जांभुळ फाटा येथुन गुरांची गाडी भरुन जात असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना समजली. तत्काळ ते घटनास्थळी पोहोचले. तोवर गावातील लोकांनी वाहन (क्र. एमएच-०८ एपी ३०२१) ही अडवुन ठेवली होती. वाहनाच्या हौदा काळ्या ताडपत्री ने झाकण्यात आला होता, ताडपत्री उघडुन पाहिल्यावर लक्षात आले की गाडीमधे २ बैल संशयित रित्या तोंडाला रश्शिने करकचुन बांधुन ठेवण्यात आले होते. त्यांना ओरडता येऊ नये अशा पध्दतीने त्यांचे तोंड बांधून ठेवले होते. अशा तऱ्हेने ती कत्तलीसाठी नेण्यात येत होती. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन हा प्रकार शहर पोलिस ठाणे येथे कळविण्यात आले. पोलिसही तात्काळ घटना स्थळी हजर झाले. पोलिसांनी वाहनचालक व मालक यांना शहर पोलिस ठाण्यात हजर केले. त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर गुरांची वाहतूक व प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.