पानवल येथील आंबा बागेत बेशुध्द अवस्थेत सापडलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पानवल येथे आंब्याच्या बागेत बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

काले चन्कन चौधरी उर्फ काळूराम डंगोरिया (वय ६५, रा. नेपाळ, सध्या सर्पराज धामस्कर-पानवल, रत्नागिरी ) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) सायंकाळी सात ते रात्री अकराच्या सुमारास पानवल येथील सर्फराज धामस्कर याच्या आंबा बागेत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डंगोरिया खबर देणार यांना सकाळ पासून कुठे दिसले नाहीत म्हणून त्यांनी आबा बागेत जावून पाहिले असता डंगोरिया बेशुद्ध अवस्थेत आढळले. तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.