कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रत्नागिरीत शिरकाव; नव्याने सापडले तीन रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरीत कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाल्याने आरोग्य जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे दोन अन्य एक असे तीन रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे हे रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाल्याने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय नगर परिषदेतील एक कर्मचारी संशयित सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सापडलेल्या तीन रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यात तोणदे येथील एक, राजीवडा येथील एक, आणि कसोप येथील एका रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय रनपतील एक कर्मचारी संशयित रुग्ण सापडला आहे. या रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. तीन बाधित आणि एक संशयित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या तिघांवर जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहे. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यातून कोरोना हद्दपार झाला होता. मात्र, आता नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केले होत्या. पालकमंत्री उदय सामंत यांनी खबरदारीसंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. आरोग्य विभाग सतर्क असताना रत्नागिरी तालुक्यात हे तीन बाधित सापडले आहेत. यामध्ये तोणदे, राजिवडा आणि कसोप येथील बाधितांचा समावेश आहे. या दोघांना घशाची खवखव, खोकला आणि श्वसनाचा त्रास सुरू होता. या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.