विवाहिता आत्महत्या प्रकरणी पती, सासरा, सासूसह नणंदेचा शोध सुरु

चिपळूण:- शहरातील पाग येथील कोमल सचिन दिलवाले या विवाहित महिलेने आपल्या चिमुकल्या समोरच आत्महत्या केल्याने चिपळुणात खळबळ उडाली. याप्रकरणी २२ डिसेंबरला चिपळूण पोलिस ठाण्यात सासू, पती, सासरा आणि नणंदेवर गुन्हा दाखल झाला. चार दिवसांपासून चौघांचा पोलिस कसून शोध घेत आहे, मात्र या चौघांचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कोमल हिचे भाऊ ऋषिकेश कुलभूषण निधानकर (३२, रा. हिंगोली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोमल हिचे सासरे माणिक दिलवाले, सासू कल्पना माणिक दिलवाले आणि पती सचिन माणिक दिलवाले (सर्व रा. चिपळूण) व नणंद नंदिनी अलोपे (रा. पुणे) यांच्याविरोधात २२ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्वरित पाग येथील दिलवाले यांच्या घरा चौकशी केली. त्याचे घर बंद असल्याचे निदर्शनास आले. शेजारी अधिक चौकशी केली. त्यावेळी रात्रीपासून घराला कुलूप असल्याचे समजले. पोलिस या चौघांचा कसून शोध घेत आहेत. पती, सासू, सासरे व नणंद यांनी पैशासाठी छळ केल्याने आत्महत्या केल्याची तक्रार कोमल हिच्या भावाने दिली आहे.