अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा

संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण ते संगमेश्वर अशी निष्काळजीपणे मोटार चालविल्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात मोटार अपघात दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद बने (वय ४५, रा. कसबा तीनबत्ती नाका, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १७) रात्री साडेआठच्या सुमारास महामार्गावरिल आंबेड रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित संतोष बने हे चिपळूण ते संगमेश्वर जात असताना आंबेड खुर्द रस्त्यावर मोटार (क्र. एमएच-१२ केएम ६२५२) निष्काळजी पणे चालवून समोरुन आलेल्या वाहनाच्या प्रखर लाईटमुळे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात चालक बने हे स्वतःच्या गाडीच्या नुकसानीस व दुखापतीस कारणीभूत झाले. या प्रकरणी रितेश गुजर यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.