श्री देव दत्तमंदिर फणसोप येथे २६ रोजी मंदिराचा रौप्य महोत्सव, श्री देव गुरुदत्त जन्मोत्सव सोहळा

रत्नागिरी:- रत्नागिरीतील श्री देव दत्तमंदिर फणसोप (जुवी) येथे मंदिराचा रौप्य महोत्सव आणि श्री देव गुरुदत्त जन्मोत्सव सोहळा मंगळवारी २६ रोजी साजरा होत आहे, तरी या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आपण उपस्थित रहावे असे आवाहन तुषार साळवी यांनी केले आहे.

रत्नागिरीतील श्री देव दत्तमंदिर फणसोप (जुवी) येथे रौप्य महोत्सव आणि जन्मोत्सव सोहळा मंगळवारी २६ रोजी साजरा होत आहे, तरी या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आपण उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारी 19 रोजी श्री दत्तगुरूंची मुर्ती प्रतिष्ठापना दिवस आहे. त्यानिमित्त श्री दत्तगुरूंच्या मुर्तीवर अभिषेक आहे. :सायंकाळी ४ ते ६ ह.भ.प. श्री. विश्वनाथ भाटे बुवा यांचे सुश्रव्य कीर्तन. शनिवार ८ वा. भजन बुवा-ह.भ.प. उल्हास लाइ, लक्ष्मीकेशव दत्त यांचे. गुरुवारी २१ रोजी सादिक भजन मंडळ, कसोप येथे सकाळी ८ वा. संप्रोक्षण विधी (होम-हवन व अभिषेक), १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी : ७ वा. भजन युवा-ह.भ.प. नंदकिशोर पिलकणकर व सुप्रसिद्ध कदम बुवांचे वाजवादक श्री. विजय पालव, लक्ष्मीकेशव भजनी मंडळ, टाकळेवाडी, फणसोप. शनिवारी 23 रोजी रात्री ९ वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा होतील. रविवार 24 ला ३.३० ते ५.३० वा. हळदीकुंकू समारंभ,
सायं. ५.३० ते रात्री ९.०० वा. महिलांकरिता होम मिनिस्टर खेळ पेंढणीचा. 25 रोजी सकाळी ९ वा. श्रीदेव लक्ष्मीकेशव मंदिर, फणसोप ते दत्त मंदिर जुवीवाडी श्री क्षेत्र प्रयाग चिखली दक्षिण काशी कोल्हापूर. श्री दत्तगुरूंच्या पादुकांची भव्य मिरवणूक सकाळी १० पादका पूजन व दर्शन सोहळा : दुपारी १२.३० वा. प्रसाद : सायं. ४ वाजता . महिलांकरिता पाककला स्पर्धा. रात्री ९ वा. कोकणचा साज संगमेश्वरी बाज. मंगळवारी २६ रोजी सकाळी ७ वा. श्री दत्तगुरुंच्या मुर्तीवर अभिषेक, सकाळी ९ वा. धरणावरील अभिषेक, सकाळी ८ ते सायं. ४ वा. रांगोळी स्पर्धा : दुपारी २ ते ४ श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ५.३० ते ७.३० वा. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा. त्यानंतर शक्ती तुऱ्यांचा नाचाचा जंगी सामना होणार आहे. त्यात शक्तीवाले शाहिर रुदाली दळवी (महाडिक) मुंबई तुरेवाले X शाहिर वसंत भोईर रायगड भूषण.