ठाणे, धाराशिव, पुणे, सातारा सांगली, सोलापूर उपांत्य फेरी दाखल

३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद, निवड चाचणी खो-खो स्पर्धा

पालघर:- महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन के. डी. हायस्कूल, चिंचणी, पालघर येथे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत किशोर गटात ठाणे, धाराशिव, पुणे, सातारा या संघांनी तर किशोरी गटामध्ये सांगली, सोलापूर, धाराशिव, पुणे यांनी उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. किशोर गटात सातारा विरुध्द सांगली हा सामना चुरशीचा झाला. सातारा संघ अवघ्या २ गुणांनी विजयी झाला.

शनिवारी (ता. २) झालेल्या सामन्यात किशोर गटात सातारा संघाने सांगलीचा २ गुणांनी (१७-१५) पराभव केला. यामध्ये विजयी संघातर्फे प्रथमेश कुंभार (२ मि.२० सेकंद आणि ३ गुण), प्रसाद बालीप (१ मि. २० सेकंद, १ मि. आणि ३ गुण), अधिराज जाधव (४ गुण) यांनी चांगला खेळ करत विजयात मोलाची कामगिरी केली. तर सांगलीतर्फे संग्राम डोंबळे (१ मि. २० सेकंद, २ मि. आणि २ गुण), श्री दळवी (१ मि. ३० सेकंद, ०.५० मि. आणि ३ गुण) यांनी चांगला खेळ केला. दुसर्‍या सामन्यात पुणेने छत्रपती संभाजीनगरचा १ डाव ८ गुणांनी (१६-८) पराभव केला. पुणेतर्फे सम्राट पांढरे (१ मि. ३० सेकंद, २ मि. आणि १ गुण), आदेश पाटील (२ मि. आणि ७ गुण) यांनी विजयात महत्वाची कामगिरी बजावली. पराभूत संभाजीनगरतर्फे तेजराज होले (२ गुण) व समर्थ हातकणगाणे (२ गुण) यांनी चांगला खेळ केला. तिसर्‍या सामन्यात धाराशिव संघाने नाशिकचा १ डाव ४ गुणांनी (१०-६) विजय मिळवला. हरदया वासावे (४ मि. आणि ३ गुण), पिंटू वळवी (२ मि. ३० सेकंद, आणि १ गुण), (१ मि. २० सेकंद, १ मि. आणि २ गुण) यांनी चांगली कामगिरी केली. नाशिकतर्फे सोमनाथ चावरे (१ मि. ३० सेंकद आणि ३ गुण), गणेश गायकवाड (१ मि. ४० सेकंद आणि ३ गुण) यांनी चांगला खेळ केला. चौथ्या सामन्यात ठाणेने सोलापूरचा १ डाव ४ गुणांनी (१३-९) असा पराभव केला. विजयी ठाणेतर्फे विनायक भांगे (३ मि., १ मि. आणि १ गुण), महेश गौतम (१ मि. ४० सेंकद, १ मि. १० सेकंद आणि १ गुण) यांनी तर पराभूत सोलापुरकडून रोहन मोरे (१ मि. आणि १ गुण) यांनी चांगला खेळ केला.
किशोरी गटातील सामन्यामध्ये सामन्यात सोलापुरने रत्नागिरीचा १ डाव ७ गुणांनी (१३ः ६) असा पराभव केला. त्यामध्ये स्नेहा लामकाणे (१ मि. १०से., २ मि. २० से. नाबाद आणि ८ गुण), अनुष्का पवार (२ मि. १० से. आणि १ गुण), समृध्दी सुरवसे (१ मि. ३० से., २ मि. ४० सें.) खेळ करत विजयात महत्वाची कामगिरी बजावली. रत्नागिरीतर्फे श्रावणी सनगरे (१ मि. १० से.), अस्मी कर्लेकर (१ मि. ४० से. आणि २ गुण) यांनी चांगला खेळ केला.दुसऱ्या सामन्यात
धाराशिव संघाने ठाणे वर (13-7) अशी मात केली. विजय संघातर्फे मैथिली पवार (2 मि. 10 सेकंद, 3 मि. 20 से. आणि 6 गुण ), सिद्धी भोसले (2 मि. 50 से., 2 मि. ) यांनी विजयात मोलाची कामगिरी बजावली. पराभूत संघातर्फे वैष्णवी जाधव (2 मि. 20 से. ), प्रणिती जगदाळे (1 मि. 30 से., 2 मि. ) यांनी चांगला खेळ केला. तिसऱ्या सामन्यात सांगलीने साताऱ्यावर 8 गुणांनी (13-5) अशी मात केली. विजयी संघातर्फे श्रावणी तामखडे (3 मि. 40 से., 3 मि आणि 1 गुण ), वैष्णवी चाफे (1 मि. 20 से., 2 मि. 30 से. आणि 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला. पराभूत ठाणेतर्फे गौरी जाधव (2 मि. 40 से., 1 मि. 20 से. आणि 2 गुण ) हिने चांगला खेळ केला. अन्य सामन्यात पुणे ने नाशिकवर 6 गुणांनी (13-7) अशी मात केली. विजयी संघातर्फे अक्षरा डोळे (4 मि. 30 से. ), सिद्धी रंगारे (1 मि. 40 से., 4 गुण ) यांनी चांगला खेळ केला. नाशिकतर्फे शीतल घागुर्डे (1 मि. 10 से., 1 मि. आणि 2 गुण ) हिने चांगला खेळ केला.