जयगड पोलिस ठाण्यात दोन मद्यपींवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील संदखोल आणि गणपतीपुळे येथील आठवडा बाजार परिसरात परवाना नसताना मद्य प्राशन करणाऱ्यां दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश अनंत भुवड (३४, रा. घोगळवाडी नांदिवडे, रत्नागिरी ) आणि सागर गोपीनाथ सुर्वे (४०,रा. भंडारपुळे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. २८) सायंकाळी साडेपाच ते पावणे आठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दोघे संदखोल व गणपतीपुळे येथील आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.