चिपळूण:- पेढे फरशी येथील रेल्वे ट्रॅकवर नेत्रावती एक्स्प्रेसखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश प्रकाश देवळे (३५, रा. परशुराम दुर्गेवाडी) या तरुणाला बुधवारी सायंकाळी ५.०५ वाजता नेत्रावती एक्स्प्रेसची धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी हवालदार रमेश चव्हाण, महेश चिले व सहकारी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. चिपळूण पोलिस ठाण्यात या अपघाताची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.