स्वच्छतेसाठी जिल्ह्यातील १० व्यावसायिकांना नोटीस

दिनानाथ शिंदे ; अन्न व औषध प्रशासन ॲक्शनमोडवर, १४ नमुने तपासणीला

रत्नागिरी:- दिवाळीपुर्वी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील १० व्यावसायिकांना स्वच्छतेत सुधारणा करा अशी नोटीस बजावली आहे. त्यांना ३० नोव्हेबरपर्यंत मूदत दिली असून त्यानंतर प्रशासनाकडुन कारवाई केली जाणार आहे. दिवाळीत केलेल्या पाहणीत १४ नमुने घेतले असून ते तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी दिले.

दिवाळीदरम्यान अन्न व औषध प्रशासन अॅक्शनमोडवर आले होते. मनुष्यबळ कमी असतानाही नऊ तालुक्यात सणाच्या कालावधीत खाद्य पदार्थांच्या दुकानात तपासणीला सुरूवात केली. काही ठिकाणी नियमित तपासणी करण्यात आली. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. खेड तालुक्यातील एका मिठाई दुकानाला १५ हजाराचा दंड करण्यात आला. दिवाळीत तपासणीवेळी बेसन, रवा, तेल आणि मिठाई यांचे १४ नमुने घेण्यात आले. ते नमुने प्रयोग शाळेत पाठविले आहेत. मात्र याचा अहवाल कधी मिळेल हे अनिश्चित आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच विक्रेत्यावर कारवाई केली जाते. मिठाई, मच्छी अशा नाशवंत पदार्थ विक्री करणाऱ्यांकडे अचानक पहाणी केली जाते. सण, उत्सवात अन्न प्रशासनाकडून व्यावसायीकांना स्वच्छतेबाबत माहीती देण्याचे काम करण्यात येते. मात्र तरीही हलगर्जीपणाच्या घटना घडत असतात. त्यांच्यावर कडक कारवाई प्रशासनाकडून केली जाते.