लाल बावट्याखाली असंघटीत कामगार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

रत्नागिरी:- मोदी हटाव, देश बचाव, मोदी सरकार हाय हाय अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत आयटकने भव्य मोर्चा काढला. संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दि.१८ डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात लाखोंच्या संख्येने असंघटीत कामगार धडक देणार असून त्याची रंगीत तालीम म्हणून आयटकच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांवर होणार्या अन्यायाविरोधात तसेच या कामगारांच्या प्रश्नांसाठी दि.१८ डिसेंबर रोजी आयटकच्यावतीने जनजागरण यात्रा आयोजित केली आहे. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने सुरु असून रत्नागिरीत मंगUवारी आशासेविका, आरोग्यसेविका व विविध संघटीत, असंघटीत कामगारांनी लाल बावटा हातात घेऊन रत्नागिरीत दणदणीत मोर्चा काढला.
यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी का@. शाम काUे यांनी सांगितले की, आज राज्यात परिस्थिती भयावह होत चालली आहे. कामगार क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यातच खाजगीकरणाचा घाट घातला आहे. यापूर्वी राज्यातील संघटीत, असंघटीत कामगारांच्यावतीने मागण्या शासनाकडे दिल्या आहेत. त्या तात्काU अंमलात आणाव्यात अन्यथा पुढील सर्व निवडणुकांमध्ये सत्ताधार्यांचा पराभव अटU आहे. केंद्र सरकारचे राष्ट्रीय संपत्ती व सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण तसेच विक्री करण्याचे धोरण तात्काU मागे घ्यावे. न@शनल मा@निटायझेशन पाईपलाईनचे धोरण रद्द करा व कामगार कर्मचारी विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा अशी मागणी त्यांनी केली.
शासकीय, निमशासकीय नगरपालिका, महापालिका, खाजगी उद्योग व आस्थापनांमध्ये हंगामी, कंत्राटी, रोजंदारी व मानधनावरील अंगणवाडी, आशा, गट प्रवर्तक, एन. आर. एच.एम. मधील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, उमेद कर्मचारी, अंशकालीन स्त्री परिचर आदी विभागातील कंत्राटी कर्मचार्यांना तात्काळ सेवेत कायम करा तसेच राज्य शासनाने घेतलेला आऊटसोा\सगद्वारे घेतलेला नोकर भरतीचा निर्णय कायमचा रद्द करा असे त्यांनी सांगितले.
यावेUी आयटकच्या वतीने शाम काळे यांनी आपल्या विविध मागण्या जाहीर करताना सांगितले की, नेहमीच संघटीत, असंघटीत कर्मचार्यांवर अन्याय होत असतो. शासनाचे वेतन धोरण देखील स्पष्ट नाही. त्यासाठी ८ तासाच्या कामाकरीता दरमहा २६ हजार रुपये वेतन निश्चित करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली