अपघात केल्याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- अपघातात दुखापतीस व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या टेम्पो चालकाविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर कल्याण गिलबिले असे संशयित टेम्पो चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) दुपारी पावणेचारच्या सुमारास रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर आंबा घाट गणपती मंदिर पासून रत्नागिरी दिशेने २०० मिटर अंतरावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित टेम्पो चालक गिलबिले हे रत्नागिरी कोल्हापूर असे टेम्पो (क्र. एमएच-१२ एसएक्स १८३६) घेऊन जात असताना घाटात गाडी निष्काळजीपणे चालवून आंबा घाटातील गणेश मंदिर रत्नागिरी च्या दिशेने २०० मिटर अंतरावर टेम्पो दरीत जावून अपघात केला. या प्रकरणी संदेश जाधव यांना देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.