साळवी स्टॉप येथे स्विमिंग पुल परिसरात मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथे स्विमिंग पुल परिसरात मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम सत्यविजय बारगोडे (वय २७, रा. कारवांचीवाडी, गणपती स्टॉप जवळ, रत्नागिरी) असे संशयिताचे ही घटना बुधवारी (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास साळवी स्टॉप येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे दारु पिण्याचा परवाना नसताना साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.