जिल्ह्यात आतापर्यंत बाराशे बंधाऱ्यांची उभारणी

रत्नागिरी:- आगामी काळात कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात येत्या वर्षी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषद स्तरावरून दिवाळीपूर्वीच ‘मिशन बंधारे’ मोहिम ग्रामपातळीवर गतीमान करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 1200 हुन अधिक बंधारे त्या त्या ठिकाणच्या नदी, नाल्यांवर उभारुन पाणीसाठा करण्यावर भर देण्यात आला आहे.

जिल्हा परिषद स्तरावरून दरवर्षी दिवाळीनंतर गतीमान केली जाणारी ‘मिशन बंधारे’ मोहिम यावेळेस दसऱयापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. या 2023-24 मध्ये जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींना पति 10 बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. दिलेल्या उद्दीष्टानुसार जिल्ह्dयात 8460 कच्चे, वनराई आणि विजय बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. मागील 2022-23 मध्ये हे उद्दीष्ट फक्त 3033 बंधारे बांधून गाठण्यात आले होते. गतवषीं झालेले जास्त पर्जन्यमान पाहता ही मोहिम उशिराने सुरू झालेली होती. त्यामुळे टंचाईची भीषणताही कमी राहिली होती.
पण या हंगामात जिल्ह्dयामध्ये पर्जन्यमानाने सरासरी देखील गाठलेली नाही. त्यामुळे पशासनस्तरावरून आतापासूनच पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन केलेले आहे. यावेळेस दसऱयापूर्वीच या मोहिमेला गती देण्यात आली आहे. दसऱयापूर्वीच ग्रामपातळीवर हे बंधारे उभारण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तेथील ग्रामस्थांचा सहभाग घेतला जात आहे. पत्येक ग्रामपंचायतींने किमान 10 बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. गेल्या 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्ह्यात या मिशन बंधारे लोकचळवळीतून 249 कच्चे, 68 वनराई तर 194 विजय बंधारे उभारण्यात आले होते. आता ही संख्या त्यापुढे गेली असून सुमारे 1200 हून अधिक बंधाऱयांची ग्रामस्तरावर उभारणी झाल्याचे जि.प.चे कृषी अधिकारी अजय शेंड्ये यांनी सांगितले.
या बंधारे उभारणीमुळे गावातील जल स्त्राsतांजवळ बंधारे बांधलेस लगतचे विहिरीची, बोअरवेलची पाण्याची पातळी वाढणेस मदत होणार आहे. जेणेकरुन उन्हाळी शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्नही काहीअंशी सुटणेस मदत होणार आहे. शेतक-यांना उन्हाळी शेत पिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावनेस मदत होणार आहे.