गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला जीवदान देण्याचे प्रयत्न सुरु

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला स्थानिक आणि वन विभागाकडून वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सोमवारी सकाळी व्हेल माशाचे पिल्लू गणपतीपुळे किनारी वाहत आले. या पिल्लाला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. एमत्स्य विभागच्या बोटीच्या साहाय्याने व्हेलं माशाच्या पिल्लाला समुद्रात ओढत नेण्यात येणार आहे. समुद्राला ओहटी असल्याने व्हेलं माशाच पिल्लू वाळूत अकडकून पडले आहे. त्या पिल्लाला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.