रत्नागिरी:- जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेला शुक्रवारपासून (ता. ३) सुरूवात झाली. येथील सर्वंकष विद्यामंदिरच्या बॅडमिंटन कोर्ट्वर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनने यंदा पुन्हा राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्याची जबाबदारी रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनला दिली आहे. ही स्पर्धा 7 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. राज्यभरातील सुमारे ३०० हून अधिक बॅडमिंटनपटू दाखल झालेले आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला गद्रे सी फूड्सच्या संचालिका सौ. मीनाताई गद्रे, सावंत ओयासिसचे केतन सावंत, सर्वांकष विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मोनिका जैस्वाल आणि राधा करमरकर, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष ओंकार हजारे, अमित मुळये, विनीत पाटील, सुधीर बाष्टे आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी गद्रे सी फूड्स, इंडियन ऑइल, सावंत ओयासिस स्पोर्ट्स अरेना, देसाई फूड प्रोडक्ट्स, करुण्या मारिन आणि योनेक्स सनराईस यांचे सहकार्य लाभले आहे.