कोकणातील चार लाख शेतकर्‍यांना नमोचा 80 कोटी 46 लाखांची निधी प्राप्त

रत्नागिरी:- पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या पहिल्या हप्त्याची 1720 कोटी रुपयांची रक्कम शेतकयांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेत कोकणातील चार लाख शेतकर्यांना नमोचा 80 कोटी 46 लाखांची निधी प्राप्त झाला आहे.

शिर्डी येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका क्लिकवर राज्यातील 85 लाख 60 हजार लाभार्थी शेतकयांच्या बँक खात्यांवर पाठवण्यात आले. नमो शेतकरी सन्मान योजनेतून खात्यावर पैसे जमा झाल्याचे शेतकर्‍याच्या मोबाईलवर मॅसेज आल्याने शेतकयांनी आनंद व्यक्त केला आहे.